शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (15:09 IST)

दीपिकापेक्षा श्रद्धा ठरली सरस

चित्रपटांची संख्या, अभिनय किंवा प्रसिद्धीपेक्षा हल्ली सोशल मीडियावरील सक्रियता आणि त्यावर चाहत्यांचे मिळत असलेले प्रेम हे देखील सरस ठरण्याचे प्रमुख कारण होऊ लागले आहे. स्कोर ट्रेंड्‌स इंडियाच्या अनुसार इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचे नाव पुढे आले आहे. विशेष म्हणजे श्रद्धाने आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण तसेच प्रियंका चोप्रासह आलिया भटला देखील मागे टाकले आहे. इन्स्टाग्रामवर सध्या श्रद्धा नंबर वनवर आहे. तिचा आगामी चित्रपट 'स्त्री' यामागील प्रमुख कारण मानले जात आहे. इन्स्टाग्रामवर श्रद्धा 100 गुणांसह सर्वश्रेष्ठ बनली आहे, तर आलिया भट 85 गुणांसह दुसर्‍या स्थानावर पोहोचली आहे. दीपिका पदुकोण 68 गुणांमुळे तिसर्‍या स्थानी तर प्रियंका चोप्रा 66 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सोनम कपूर अहुजा 59 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.