मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 ऑगस्ट 2018 (09:09 IST)

अभिनेत्री नेहा धुपिया लवकरच आई होणार

neha dhupia
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया - बेदी लवकरच आई होणार असल्याचे सांगितले आहे. तीन महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते आणि त्याचवेळी ती गर्भवती असल्याच्या बातम्या देखील काही प्रसारमाध्यमांनी दिल्या. आता तिने स्वत: आपण आई होणार असल्याचे सांगितले आहे. नेहाने पती अंगद बेदीसोबतचे काही फोटो शेअर करून ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. नेहाने पती अंगदसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये ते पोटाकडे इशारा करताना दिसत आहेत. फोटोत नेहा आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोसोबत तिने ‘नवीन सुरुवात होत आहे… आम्ही तिघे…सतनाम वाहे गुरु।’,असे कॅप्शन देखील दिले आहे.