रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (15:44 IST)

सलमान खान ट्वीटमुळे झाला ट्रोल

अभिनेता सलमान खानने केलेल्या ट्वीटमुळे त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. भारतच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या सलमानने देशाचे माजी पंतप्रधान, कवी आणि दिग्गज नेता अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर ५ दिवसांनी त्यावर शोक व्यक्त केला. यामुळेच सलमानला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.
 
सलमान खानने ट्वीट केले की, एक महान नेता, दिग्गज राजनेता, वक्ता आणि एक श्रेष्ठ नेते अटलजींच्या निधनामुळे मी दुःखी आहे. सलमानच्या या ट्वीटची युजर्सने चांगलीच खिल्ली उडवली. एका युजरने लिहिले की, खूप दिवसानंतर आठवण आली सर. तर दुसऱ्याने म्हटले, टायगर झोपला होता. 
 
याशिवाय केरळातील पीडितांसाठी सलमान खानने ट्वीट केले. त्यात सलमानने लिहिले की, केरळमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मी अजूनही धक्क्यात आहे. माझी संवेदना पुरग्रस्तांसोबत आहे. पण मदतीसाठी पुढे आलेल्या लोकांसाठी मी खूप खूश आहे. पण या ट्वीटवर सलमान ट्रोल झाला नाही.