बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (12:32 IST)

तब्बल 13 वर्षांनंतर जमणार राणी-अभिषेकची जोडी

2005 मध्ये शाद अलीचे दिग्दर्शन असलेला 'बंटी और बबली' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव 2005 सालच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत होते. राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यातमुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचा सिक्वल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बंटी और बबली' हा एक क्राइम-कॉमेडी चित्रपट होता. निर्माता आदित्य चोप्राला या चित्रपटाच्या सिक्वलसाठी एक उत्तम कथा मिळाली असल्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण शाद अली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार नसून, नेमके कोण करणार हे आप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. ही जोडी या चित्रपटाशिवाय 'युवा', 'बस इतना सा ख्वाब है', 'कभी अलविदा ना कहना'सारख्या चित्रपटांमध्येही एकत्र झळकली आहे. तब्बल 13 वर्षांनंतर ही जोडी आता एकत्र येणार असल्यामुळे 13 वर्षांपूर्वीची ती जादू ही जोडी टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरते का? हे पाहाणे अधिक रंजक ठरणार आहे.