रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (09:26 IST)

‘हिचकी' कझाकस्तानमध्ये प्रदर्शित होणार

राणी मुखर्जीचा ‘हिचकी’हा चित्रपट रशियानंतर आता कझाकस्तानमध्येही प्रदर्शित होणार आहे. स्वत:च्या अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांसाठी धडपडणाऱ्या शिक्षिकेची गोष्ट ‘हिचकी’मधून दाखवण्यात आली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्यामधील गोष्ट सांगणारा हिचकी पुढील महिन्यात रशियात प्रदर्शित होत आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात हा चित्रपट कझाकस्तानमध्येही प्रदर्शित होणार आहे. भारतामध्ये तो मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित झाला आहे. 
 
‘शंघाय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाचं भरभरून कौतुक करण्यात आलं. ६ सप्टेंबरला हा चित्रपट रशियात प्रदर्शित होणार आहे.रशियानंतर २० सप्टेंबरला हिचकी कझाकस्तानमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ७६ कोटींची कमाई केली होती. सिद्धार्थ मल्होत्रानं या चित्रपटानं दिग्दर्शन केलं आहे.