मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (15:53 IST)

‘कॉफी विद करण’ पहिले गेस्ट दीपिका व रणवीर

दीपिका व रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या सुपरहिट शोमध्ये गेस्ट म्हणून दिसणार आहेत. करणने अलीकडे ‘कॉफी विद करण’च्या नव्या सीझनची घोषणा केली आहे. या शोचे पहिले गेस्ट असणार आहेत. खरे तर ‘कॉफी विद करण’मध्ये हे दोन्ही कलाकार यापूर्वीही अनेकदा दिसलेत. पण रणवीर व दीपिका एकत्र असे पहिल्यांदाचं या शोमध्ये करणच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसतील. ‘कॉफी विद करण’च्या याआधीच्या सीझनमध्ये ही जोडी एकत्र दिसेल, अशा बातम्या होत्या. पण दीपिका कामात बिझी असल्यामुळे हा योग चुकला होता. पण दीपिका व रणवीरच्या लग्नापूर्वी हा योग जुळून आला आहे.
 
येत्या २० नोव्हेंबरला इटलीतील लोम्बा येथे असणाऱ्या लेक कोमो या नयनरम्स ठिकणी ‘दीप-वीर’चा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे.