सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 मार्च 2018 (12:53 IST)

रणवीरची फी ऐकून तुम्हाला बसेल धक्का

येत्या 7 एप्रिलपासून सुरू होणार्‍या इंडियन प्रीमिअर लीगच्या(आयपीएल) उद्‌घाटन सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी अभिनेता रणवीर सिंहने जी किंमत घेतली आहे ती ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. आयपीएलमध्ये केवळ 15 मिनिटांसाठी परफॉर्म करण्याचे रणवीर 5 कोटी रुपये घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या देशभरात रणवीरचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या या चाहत्यांना वयाचे बंधनही नाही. त्यामुळे आयपीएलच्या उद्‌घाटन सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी रणवीरपेक्षा योग्य व्यक्ती आपल्याला सापडली नसती, असे मत आयोजकांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.