रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'या' फोटोमुळे सुनील ग्रोवर झाला ट्रोल

सुनील ग्रोवरने  ट्विटरवर  नुकताचभाजी मंडईत बसून भाज्या विकतानाचा एक फोटो पोस्ट केला.  आता या फोटोवरूनही सुनील ट्रोल झाला आहे. सुनीलच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला परत कपिलसोबत काम करण्याचा सल्ला दिला. 
 
या फोटोला सुनीलने उद्योजक असे कॅप्शन दिले. हा फोटो मुद्दाम कपिलला उद्देशूनच काढला असावा असे काहींचे मत आहे. उपरोधितपणे तो कपिलवर भाष्य करत असल्याचे काहींनी त्याच्या कमेंटमध्येही लिहिले. काही दिवसांपूर्वी कपिल आणि सुनीलमध्ये ट्विटर वॉर सुरू होते. सध्या कपिल फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा या त्याच्या नवीन शोमध्ये व्यग्र आहे तर सुनीलही लवकरच त्याचा एक नवाकोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.