शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पोट धरून हसा..

दत्तुची आई :  वीस वर्ष मला काहीच मुलबाळ नव्हतं .
गण्याची आई : अगं बाई गं ! मग काय केल हो तुम्ही ?
दत्तुची आई : काही नाही ! मग मी २१ वर्षाची झाले, बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला !!
 
नदी किनारी जोडपे बसलेले असते
प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे
प्रियकर : तोच ग ....
२५पैसा १ मिनीट
प्रेयसी : मर मेल्या मोबाईल मधेच
 
लोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते.
एकदम चूक 
आम्ही लहान पणा पासून अभ्यास करतोय 
लागली का सवय ?
याला म्हणतात Control. 
 
बर झाले ‪लग्नासाठी‬ आरक्षण नाहीये 
नाही तर
‪OPEN‬ ‪‎वाले‬ ‪‎बिनलग्नाचे‬ मेले असते
 
मानलेली बहीण,
मानलेला भाऊ,
मानलेले आई - बाबा, काका - मामा मावशी,
ही मानलेली नाती चालतात....
तर मानलेली " बायको " यात काय
प्रॉब्लेम?
 
भावाचा मित्र भावासारखा असतो
बहिणीची मैत्रीण बहिणी सारखी
तर बायकोची मैत्रीण
बायकोसारखी का नाही ??
 
त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या.
ज्या, सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या 
" सर आज तुम्ही Homework चेक करणार होता ना??
लास्ट बेंच मित्रमंडळ..
 
गुरुजी - हॉस्पिटलमधल्या चिह्नाचा अर्थ सांग पाहू.
बंड्या - उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट..
 
मार्टिन ल्युथर किंगने सांगितले
"तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.
पळू शकत नसाल तर चाला.
चालू शकत नसाल तर रांगा.
पण पुढे सरकत राहा."
एका मालवणी माणसाने विचारले,
"तसा नाय पन एवढी वडातान करून जावचां खय हा?
 
पोरगी पोरग्याला:
"तुझी स्माइल काय गजब हायं..
दात कशे चमकुन रायले बे इतके...? 
पोरगं लाजून... 
"माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!"