बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 26 मार्च 2018 (11:41 IST)

'खिचडी'मध्ये दिसणार परेश रावल

आपला आगामी शो खिचडीसोबत स्टार प्लस आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजन व हास्याचा डबल डोस घेऊन येत आहे. या शोचे निर्माते पारेख परिवारातील टेलिव्हिजनवरील लोकप्रिय व्यक्तिरेखा व क्रेझी कथा घेऊन येत आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, प्रख्यात अभिनेते परेश रावल यांना या शोमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात आले आहे. निर्मात्याच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले, परेश रावल हे कॉमेडी किंग आहेत व या शोमध्ये ते असतील तर आम्हाला फार आवडेल. त्यांनी आपल्या शक्तिशाली प्रदर्शनासह प्रेक्षकांना 1 दशकाहून अधिक काळापासून थक्क केले आहे. ऑफस्क्रीनही ते खूप छान स्वभावाचे आहेत व या शोमधील त्यांच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांना खूप मस्त वाटेल. आपल्या हेराफेरी या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखले जाणारे पद्मश्री पुरस्कार विजेता परेश रावल यांना आपले काम व मनोरंजन उद्योगातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले  आहेत. त्यांनी हलचल, हंगामा, अतिथी तुम कब जाओगे?, आँखें व अशाच अनेक चित्रपटांधून कमे केली आहेत. खिचडीमधील त्यांच्या अतिथी उपस्थितीमुळे प्रेक्षकांना एक तासाच्या गुदगुल्या करणार्‍या विनोदासोबत पारेख परिवाराशी जोडलेल्या सगळ्या आठवणींशी परत एकदा जोडले जाण्याची संधी मिळेल.