मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 मार्च 2018 (09:21 IST)

'दीपिका पदुकोण' इंस्ट्राग्राम साइटची राणी

dipika padukon

अभिनेत्री  दीपिका पदुकोण आता इंस्ट्राग्राम या सोशल नेटवर्किंग साइटची राणी ठरली आहे. सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या अकाऊंटचे अवॉर्ड दीपिका पदुकोणने मिळवले आहे. ‘Most Followed Account’ हा पुरस्कार दीपिकाला जाहीर झाला आहे. तर क्रिकेटर विराट कोहलीला मोस्ट एंगेज्ड अकाऊंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंस्टाग्रामने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षीसांची भारतात घोषणा केली आहे.

विराट कोहलीचे फॉलोअर्स १ कोटी ९० लाखांच्या घरात आहेत. सर्वाधिक एंगेज्ड अकाऊंटचा पुरस्कार त्याच्या अकाऊंटला जाहीर झाला आहे. २०१७ या वर्षात लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊसच त्याच्या अकाऊंटवर पडला आहे. तर अभिनेत्री प्रियंका चोप्राला मागे सारत दीपिका पदुकोण ही इंस्टाग्रामची क्वीन ठरली आहे. २ कोटी २० लाखांच्या वर फॉलोअर्स मिळवले आहेत. प्रियंका चोप्राचे फॉलोअर्स २ कोटींच्या घरात आहेत. तर आलिया भट ही अभिनेत्री इंस्टावरच्या टॉप थ्री अभिनेत्रींमध्ये तिसरी आहे. कारण जवपास १ कोटी ९० लाखांच्या घरात तिचे फॉलोअर्स आहेत.