सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मी राजकारणात येऊ शकते

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मी सर्वांत मोठी चाहती आहे. एक चहा विकणारा व्यक्ती आज देशाचा पंतप्रधान आहे. अर्थात हा त्यांचा नाही तर देशाच्या लोकशाहीचा विजय आहे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत हिने व्यक्त केले आहे. कंगना हिची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ' मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाच्या एका कार्यक्रात ती बोलत होती. दरम्यान, यावेळी कंगना हिने राजकारणाबद्दलच्या तिच्या मतांना मोकळी वाट करून दिली. ती म्हणाली, मला राजकारणात येण्यास काहीही अडचण नाही. पण मला नेत्यांचा फॅशन सेन्स आवडत नाही. मला माझ्या ग्लॅमरसह राजकारणात लोक स्वीकारण्यास तयार असतील, तर मी राजकारणात येऊ शकते, असेही ती म्हणाली. दरम्यान, तिच्या या वक्तव्यांमुळे ती आता राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.