बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (09:44 IST)

‘सिमरन’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

कंगना राणावतच्या ‘सिमरन’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये कंगना एका रॉयल लूकमध्ये दिसत आहे. ती एका हॉटेलमध्ये एका टेबलावर ड्रिंक करत असताना, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्मितहास्य करताना दिसत आहे. त्या फोटोकडे बघून ती एक सुंदर क्षण आनंदात एन्जॉय करत आहे.
 
चित्रपटात ती एका हाऊसकीपरच्या भूमिकेत दिसणार आहे. ती खूप साऱ्या क्राईममध्ये लगेचच सहभागी होते. तसेच, हा चित्रपट हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या टीझरला पहिले रिलीज केले आहे. टीझरला बघून असे वाटते की ती पुन्हा एकदा बॉलीवूडचा पुरस्कार पटकावणार. १५ सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. कंगना आता ‘मणिकार्णिक’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.