शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2017 (16:42 IST)

कंगनाने ‘मणिकर्णिका’ ची संकल्पना चोरली : केतन मेहता

‘मणिकर्णिका’ सिनेमाची संकल्पना कंगनाने चोरल्याचा आरोप दिग्दर्शक केतन मेहता यांनी केला आहे. दिग्दर्शक मेहता यांनी कंगनाविरोधात एक कायदेशीर नोटीस बजावली आहे. केतन यांनी कंगना, ‘मणिकर्णिका’ सिनेमाचे निर्माते कमल जैन आणि इतर टीमवर ‘रानी ऑफ झांसी- द वॉरिअर क्‍वीन’ या त्यांच्या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टची संकल्पना चोरल्याचा आरोप केला आहे.

केतन यांनी आपल्या जबाबात सांगितले की, ‘जून २०१५ मध्ये मी कंगनाला माझ्या सिनेमात राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी विचारले होत.  तेव्हा तिने या सिनेमात काम करण्याचे मान्यही केले होते. आम्ही तिला सिनेमाची संहिता आणि काही संशोधन केलेली कागदपत्र पाठवली होती. या विषयावर आमच्या चर्चाही झाल्या होत्या. पण नंतर तिने ‘मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी’ Manikarnika – The Queen of Jhansi या सिनेमाची घोषणा दुसऱ्याच दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत केली. त्यामुळे आमच्या सिनेमाची संकल्पना चोरल्यामुळे आम्ही कंगनाला नोटीस बजावली आहे.’