मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 ऑगस्ट 2018 (12:52 IST)

हाय हिल्स घालून करायला गेली एक; घडलं भलतंच

प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी ऊप्स मोमेंट अर्थात एखाद्या लाजिरवाण्या घटनेचा सामना करावा लागतो. ही घटना घडताना कुणी पाहिलं तर नसेल असं आपल्याला वाटत राहतं. जर कुणी बघितलंच असेल तर आपलं चारचौघात हसू होऊ नये अशीही अनेकांची इच्छा असते. असाच काहीसा लाजिरवाणा प्रकार हेट स्टोरी-4 या सिनोची अभिनेत्री उर्वशी रौटेलासोबत घडली आहे. त्याचं झालं असं की उर्वशी  फोटोशूटसाठी एका बागेतील उंच कठड्यावर चढली. यावेळी तिने पायात हाय हिल्स सँडल घातली होती. ती स्टाइलमध्ये पोजही देत होती. मात्र अचानक तिचा तोल गेला. खाली पडता पडता तिनं स्वतःला कसंबसं सावरलं. यानंतर तिलाच स्वतःवरचं हसू रोखता आलं नाही. उर्वशीचा हाच तोल जाणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अवघ्या काही तासांतच हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक नेटिझन्सनी पाहिला आहे.
 
उर्वशी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती सतत तिचे वेगवेगळे पोज दिलेले फोटोशूटमधील काही खास फोटो तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. बर्‍याचदा तिचा अतिउत्साह तिला नडतोही म्हणूनच तिच्या लूकमुळेही ती खूपट्रोल केली जाते. उर्वशीला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिेंटविषयी ट्रोल केले जाते. तसेच या गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्याचे तिने म्हटले आहे.