1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 ऑगस्ट 2018 (17:00 IST)

काळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे सादर

Kaljat Ghanti Vaajte
सचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना व अमित पंकज पारीख प्रस्तुत 'पार्टी' या सिनेमातील नुकतेच एक रोमेंटिक गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँँच करण्यात आले आहे. 'काळजात घंटी वाजते' असे या गाण्याचे बोल असून, मैत्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या या सिनेमातील चार मित्रांची आपापली गुलाबी दुनिया या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, रोहित हळदीकर, स्तवन शिंदे, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या सिनेमातील प्रमुख कलाकारांवर हे रॉमेंटीक गाणे चित्रित करण्यात आलेले आहे.
 
'पार्टी' सिनेमातील  'काळजात घंटी वाजते' हे गाणे आजच्या तरुण पिढीला भुरळ पाडणारे ठरत आहे. मित्रांच्या खाजगी आयुष्यातील गुलाबी क्षणचित्रे मांडणाऱ्या या रॉमेंटीक गाण्याचे लेखन गुरु ठाकूर यांनी लिहिले असून, अमितराजने संगीत दिलेल्या या गाण्याला स्वतः अमितराज आणि निहिरा जोशीने आवाज दिला आहे. मित्रांची दुनियादारी आणि त्यासोबतीला प्रेमाची फोडणी असणाऱ्या या सिनेमात सुव्रत जोशी - प्राजक्ता माळी आणि अक्षय टंकसाळे - मंजिरी पुपाला अशी जोडगोळीदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत 'पार्टी' या सिनेमातील हे गाणे आजच्या तरुण मनात प्रेमाची पालवी फुलवणारे ठरत आहे.
मैत्रीच्या धम्माल कट्टा 'पार्टी' वर आधारित असलेला हा सिनेमा महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना आपल्या मित्राची आणि मैत्रिणीची आठवण करून देणारा आहे. त्यामुळे येत्या ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाच्या निमित्ताने, नजीकच्या सिनेमागृहात जुन्या मित्रांसोबत जाऊन गेटटुगेदर 'पार्टी'ची मज्जा लुटायला हरकत नाही !