मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (13:58 IST)

कतरिनाबरोबर भांडण नाही

कतरिना आणि आलिया यांच्यात काहीतरी बिनसले आहे, असे ऐकिवात आले होते. मात्र आलियाने असा कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. कतरिना तर आपली अगदी आवडती अ‍ॅक्ट्रेस असल्याचे आलिया म्हणाली. आलिया आणि कतरिनाचा पूर्वीचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर यांच्याडेटिंगला सुरुवात झाल्यापासून या दोघींमधील केमिस्ट्री बिघडल्याचे ऐकायला मिळत होते. इन्स्टाग्रामवर आलियाच्या फोटोंना कतरिनाने लाईक करणे थांबवले आहे. त्यावरून गॉसिप फॅक्टरीने हा निष्कर्ष काढला. कतरिना आणि आपल्यातले नाते पूर्वीसारखे साधे सरळच आहे. मग यातून गैरअर्थ का काढला जातो आहे, हे आपल्याला समजत नाही. जर फोटो लाईक करणे एवढे महत्त्वाचे असेल, तर मी कतरिनाला मेसेज करते आणि फोटोला लाईक करायला सांगते. कदाचित माझे फोटो लाईक करण्यासारखे नसतील. ही शक्यता आहे. मात्र आमच्यामध्ये कोणताही तणाव नाही, हे नक्की आहे, असे आलिया म्हणाली. रणवीर सिंहबरोबर 'गली बॉईज', रणबीर आणि अमिताभ बच्चन  यांच्याबरोबर 'ब्रम्हास्त्र' आणि करण जोहरच्या 'तख्त'मध्ये अलिया आहे. आलिया प्रथमच ऐतिहासिक सिनेमात काम करत आहे. त्यामुळे तिच्यावर थोडे दडपणही आले आहे.