शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

श्रद्धा सायनावर नाराज

बॅडमिंटन पटू सायना नेहवालचीही आता बायोपिक येणार आहे. या सिनेमात सायनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारणार आहे. गेल्या वर्षभरापासून श्रद्धा कपूर बॅडमिंटन कोर्टमध्ये घाम गाळतेय. पण आता तिचाही संयम सुटलाय आणि आता तिने सायना नेहवालला खरी-खोटी सुनावली. या बायोपिकमध्ये श्रद्धाने सायनासारखे अगदी प्रोफेशनल प्लेअर दिसावे, असा सायनाचा अट्टहास आहे. माझी व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठी श्रद्धाला आणखी मेहनत करावी लागेल, असे सायना अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली. सायनाची ही मुलाखत ऐकली आणि श्रद्धा नाराज झाली. 'सायनाच्या बायोपिकसाठी मी जीवतोड मेहनत घेतेय. कोर्टवर प्रोफेशनल प्लेअर दिसावी, म्हणून माझेही प्रयत्न सुरू आहेत. पण काही महिन्यांच्या प्रशिक्षणात मी एकदम प्रोफेशनल प्लेअर बनून जाईल, हे शक्य नाही. एक वर्षात मी खूप घाम गाळला आहे', असे श्रद्धा म्हणाली. सूत्रांचे मानाल तर श्रद्धाने निर्माता-दिग्दर्शकालाही माझ्या कामाबद्दल समाधानी नसाल तर दुसरी सोय बघा, हे सांगून टाकले आहे. 2017 हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी फारसं लकी राहिलं नाही या वर्षात आलेले 'ओके जानू' आणि 'हसीना पारकर' हे तिचे दोनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. लवकरच श्रद्धाचा 'स्त्री' आणि 'बत्ती गुल मीटर चालू' रिलीज होत आहेत.