1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

भूमी तख्तबाबत उत्साही आणि नाराजही

bhoomi pednekar
करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार्‍या तख्तमध्ये काम करणारी भूमी पेडणेकर या सिनेमाबद्दल थोडी उत्साही आणि थोडी नर्व्हसही आहे. या ऐतिहासिक सिनेमातील कामाबाबत अजून आपले मत पूर्ण तयार झाले नसल्याचे तीम्हणाली. तख्तमध्ये करिना कपूर खान, रणवीर सिंह, आलिया भट, विकी कौशल, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर असणार आहेत. या सगळ्यांना एक कलाकार म्हणून भूमी मानते. या सगळ्यांबरोबर कामाचा अनुभवही खूप चांगला आहे. करण जोहरची तर ती चांगली फॅन आहे. मात्र ऐतिहासिक विषयाचे दडपण तिच्यावर आले आहे. अजून या विषयाला अनुकूल मनोभूमिका तयार करू न शकल्यामुळे थोडे नर्व्हस व्हायला झाल्याचेही तिने सांगितले. नुकत्याच रिलीज झालेल्या लस्ट स्टोरीजमधील कामाबद्दल भूमीचे खूप कौतुक होते आहे. चांगले रोल आणि चांगले सिनेमे मिळत असल्यामुळे ती खुशीत आहे. आतापर्यंत ज्या कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली, त्यांच्याबद्दल तिच्या मनात कृतज्ञतेचेही भाव आहेत. केवळ तीन वर्षात तिला तीन हिट सिनेमे मिळाले आहेत. भविष्यातल्या सिनेमांबाबत तिला खूप अपेक्षा आहेत.