शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (14:48 IST)

'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर

mand he vede
मन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना…|
मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या हृदयस्पर्शी गीताचे नुकतेच मुंबईतील ‘एम स्क्वेअर’ स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करण्यात आले. कवयित्री वैशाली मराठे यांनी लिहिलेल्या गीताला जीवन मराठे यांनी संगीत दिले असून प्रसिद्ध गायिका अन्वेषा हिने या गीताला स्वरसाज चढविला आहे. संगीत-संयोजन वरुण बिडये यांचे आहे तर तांत्रिक बाजु अनिल शिंदे यांनी सांभाळली आहे. या अल्बमची निर्मिती श्रीनिवास गोविंद कुलकर्णी यांनी केली असून तो  येत्या २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल अशी माहिती त्यांनी दिली.
कुमार वयातच ‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. यापूर्वी अन्वेषाच्या आवाजातील ”बबन” चित्रपटातील मराठी गीतांना रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. ‘मन हे वेडे….’ या अल्बममधील गाणे देखील तिने अतिशय तरल आवाजात गायले  असून हा अल्बम देखील रसिकांना आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी बोलून दाखविला.