शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (11:55 IST)

क्रिती सॅनन व सुशांत सिंग राजपूतचे ब्रेकअप

क्रिती सॅनन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या अफेअरची चर्चा फार जुनी नाहीच. ही चर्चा अगदीच ताजी असताना, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. होय, हे अफेअर तुटल्याची नवी चर्चा सध्या जोरात आहे. क्रिती व सुशांत यांचे ब्रेकअप झाले आहे. क्रितीला आता या रिलेशनशिपमध्ये जराही इंटरेस्ट उरलेला नाही आणि तिने हे रिलेशन संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर क्रिती व सुशांतने आपल्या रिलेशनशिपमधून तूर्तास ब्रेक घेतल्याचेकानावर आले होते. पण आता दोघांचेही ब्रेकअप झाल्याची चर्चा जोरात आहे. तूर्तास सुशांत 'क्रिजी और मनी'च्या शूटिंगमध्ये तर क्रितीने 'लुकाछिपी'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 'लुका-छिपी'चे शूटिंग ग्वालियर, मथुरा आणि आग्रामध्ये होणार आहे. यात कार्तिक एक लोकल टीव्हीचा स्टार रिपोर्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर क्रिती सॅनन त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे.