मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 14 जानेवारी 2019 (11:34 IST)

महेश बाबूसोबत जमणार कतरिनाची ऑनस्क्रीन जोडी

आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केलं आहे. खूप कमी वेळेत तिने आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सध्या कतरिना सलमानच्या 'भारत' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटानंतर ती चित्रपट दिग्दर्शक सुकुमार यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू स्क्रीन शेअर करणार असून ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला ळिणार आहे. सध्या या चित्रपटाविषयी केवळ चर्चा सुरु असून अद्याप या चित्रपटाचं नाव निश्चित झालेलं नाही. मात्र या चित्रपटामध्ये कतरिना आणि महेश बाबू हे प्रमुख भूमिकेत असावे अशी चित्रपट दिग्दर्शकांची इच्छा असून त्यांनी याप्रकरणी दोन्ही कलाकारांकडे विचारणा देखील केली आहे. विशेष म्हणजे महेश बाबूने या चित्रपटासाठी होकार कळविला असून कतरिनाने मात्र आपकोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, जर कतरिनाने हा चित्रपट साईन केला तर 10 वर्षांमध्ये तिचा हा तिसरा तेलुगू चित्रपट ठरणार आहे. कतरिनाने यापूर्वी व्यंकटेश दुग्गुबती यांच्या  'मल्लिकाश्र्वरी' आणि नंदमूरी बालकृष्ण यांच्या 'अलारी पिडुगु' या चित्रपटामध्ये काम केलं आहे.