1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (13:10 IST)

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चे कलेक्शन खाली आले

Thugs Of Hindostan
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा अगदी तोंडावर पडला आहे. सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे खाली आले आहेत. विकेंडपर्यंत या सिनेमाने ठिक ठाक कमाई केली. पण आता वीकडेज सुरू झालेल्या मात्र हा सिनेमा चांगला चालत नाही. सिनेमाने रिलीजच्या पहिल्या सोमवारी 90 टक्के घसरण पाहायला मिळाली. बॉक्स ऑफिस इंडियानुसार सोमवारी ठग्स ऑफ हिंदुस्तानने 5 ते 5.25 टक्के बिझनेस केला आहे. ही घसरण जास्त करून उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पाहायला मिळाली. 
 
सिनेमाने आतापर्यंत 124 करोड रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दिवशी गुरूवारी 50.75 करोड, शुक्रवारी 28.25 करोड, शनिवारी 22.75 करोड आणि रविवारी 17.25 करोड रुपये कमाई केली आहे.