मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (14:26 IST)

इटलीत लग्नाच्या तयारीची जोरात लगबग सुरू

बॉलिवूडमधली लोकप्रिय जोडी दीपिका आणि रणवीर यांचा परीकथेला शोभेल असा त्यांच्या विवाहसोहळा इटलीत १४ आणि १५ नोव्हेंबरला पार पडणार आहे. संजय लीला भन्साळी, शाहरुख खान, फराह खानसह काही मोजक्या आणि जिवलग व्यक्तींच्या साक्षीनं हा विवाहसोहळा पार पडणार आहे. 
 
लेक किमो मधल्या व्हिला दी बाल्बिआनेलो येथे कोंकणी आणि सिंधी पद्धतीनं विवाहसोहळा होणार आहे. सातशे वर्षे जुना असा हा व्हिला लेक किमो परिसरातला सुंदर व्हिला मानला जातो. इटलीच्या संपन्न इतिहासाच्या खुणा त्यानं आजही जपल्या आहेत. रोमन शैलीचा प्रभाव इथल्या प्रत्येक गोष्टीवर जाणवतो. हा व्हिला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. मात्र रविवारपासून तो पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. येथे लग्नासाठी कडेकोट सुरक्षा करण्यात आली आहे. काही संकेतस्थळांच्या माहितीनुसार लग्नासाठी लागणाऱ्या सामानाची ने- आण करणाऱ्या गाड्यांनाच केवळ आत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाहतुकीसाठी वेगळा रस्ता खुला करण्यात आला आहे.