मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (07:58 IST)

लग्नाची तयारी जोरात, मंगळसूत्र ही केले खरेदी

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. दीपिका तिच्या लग्नात दागिन्यांनाही फार महत्त्व देताना दिसणार आहे. या साऱ्यामध्ये तिने मंगळसूत्रालाही तितकच महत्त्व दिले आहे. सोलिटाय़र असणारे एक मंगळसूत्र तिने पसंत केल्याचे वृत्त आहे. तिने पसंत केलेल्या या मंगळसूत्राची किंमत ही २० लाखांच्या घरात आहे.लग्नसोहळ्यासाठी दीपिका जवळपास एक कोटी रुपये खर्च करणार असल्याचे कळत आहे. अंधेरीतील एका उच्चभ्रू दागिन्यांच्या दुकानातून तिने हे दागिने खरेदी केल्याचे कळत असून, रणवीरसाठीही सोनसाखळी खरेदी केल्याचे कळत आहे.