शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (16:22 IST)

लेकीसाठी अजय-काजोलने घेतला नवा आशियाना

गेल्या काही दिवसांपासून सिंगापूरध्ये काजोल आणि अजय आपली मुलगी न्यासासाठी नवा आशियाना शोधत होते. न्यासा सिंगापूरमधील युनायडेट वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ इस्ट एशियामध्ये शिकत आहे. न्यासा शिकत असलेल्या शाळेचे स्वतंत्र हॉस्टेल आहे. पण हॉस्टेलमध्ये न्यासाला राहायचे नाही तिला स्वंतत्र राहायचे असल्यामुळे तिच्यासाठी अजय-काजोलने सिंगापूरमधील एका उच्चभ्रू वस्तीत आलिशान अपार्टमेंट खरेदी केले असल्याचे वृत्त आहे. न्यासा या घरात जानेवारी 2019 पर्यंत शिफ्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अजयच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर लवकरच तो  'धमाल' फ्रेंचाइजीचा तिसरा भाग असलेल्या टोटल धमालमध्ये दिसणार आहे. 'टोटल धमाल' 7 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. अजय देवगणसह या चित्रपटात माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर फक्त या गाण्यापुरती सोनाक्षी चित्रपटात झळकणार आहे. 1971 साली प्रदर्शित झालेल्या राज एन सिप्पी यांच्या 'इनकार' या चित्रपटातील 'मुंगडा' गाण्याचे रिमेक या चित्रपटात दिसणार आहे. वारसी, बोमन इराणी आणि संजय मिश्र यांच्या भूमिका आहेत.