शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (20:34 IST)

सलमानचे चित्रपट म्हणजेच भारतीय सिने नव्हेत : नसरुद्दीन

बॉलिवूड अभिनेते नसरुद्दीन शाह वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. मामी मुंबई चित्रपट महोत्सवात नसरुद्दीन शाह 'सलमान खानचे चित्रपट' या विषयावर बोलत होते. नसरुद्दीन म्हणाले, 'माझे मत आहे की सिनेमा समाजाला नाही बदलू शकत किंवा कुठलीही क्रांती आणू शकत नाही. सिनेमा शिक्षणाचे माध्यम आहे की नाही याबद्दलही काही सांगता येत नाही. डॉक्यूमेंटरीतून शिक्षण मिळू शकते. परंतु, फीचर चित्रपट हे काम करू शकत नाहीत. लोक ते चित्रपट पाहून विसरून जातात. गंभीर प्रकारचे चित्रपटाचे काहीअंशी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी 'अ वेडनसडे' आणि लघू चित्रपट 'रोगन जोश'मध्ये काम केलं आहे.' नसरुद्दीन शाह म्हणाले, 'अशा चित्रपटांचा भाग बनणे मी माझी जबाबदारी मानतो. सिनेमे नेहमी राहणार. हे चित्रपट 200 वर्षांनंतरही पाहाता येऊ शकतात. लोकांना माहिती व्हायला हवी की, 2018 मध्ये भारत कसा होता? 200 वर्षांनंतर त्यांना केवळ सलमान खानचे सिनेमे पाहायला मिळतील, असे व्हायला नको. सिनेमे भावी पिढींसाठी असतात.' 'रोगन जोश'चे स्क्रिनिंग मामी मुंबई चित्रपट महोत्सवात करण्यात आले.