मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (11:30 IST)

शाहरुख खानच्या 'मन्नत'चे वीज बिल किती आहे? या 6 कलाकारांना इथे देखील मागे सोडले

बॉलीवूड किंग शाहरुख खानचा आज (2 नोव्हेंबर) 53वा वाढदिवस आहे. त्याला बॉलीवूडमध्ये 25 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. ज्यामध्ये त्याने  एका हून एक हिट चित्रपट दिले आहेत.
 
आपण जाणून घेऊ त्याच्या घराच्या विजेच्या बिलाबद्दल जे ह्या 6 कलाकारांना पेक्षाही जास्त येत.
 
* सर्वात आधी बोलूया कॅटरीना कैफबद्दल. कॅटरीना कैफने मुंबईच्या घरी 10 लाख रुपये प्रति महिना वीज बिल भरले आहे, जे या यादीत सर्वात कमी आहे. या दिवाळीत कॅटरीनाचा ठग्स ऑफ हिंदोस्तां चित्रपट येत आहे ज्यात ती अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या सोबत दिसणार आहे.
 
* त्याचवेळी, बॉलीवूडची पद्मावती दीपिका पादुकोण हिने महिन्याचे विजेचे बिल 13 लाख रुपये भरले. याच महिन्याच्या 14 आणि 15 तारखेला दीपिका तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणवीर सिंगशी विवाह करणार आहे. रणवीर आणि दीपिका प्रथम संजय लीला भंसाली यांची सुपर हिट फिल्म रामलीला (2013)मध्ये एकत्र काम करताना भेटले होते.
 
* बॉलीवूड सुपरस्टार अमीर खान आपल्या वांद्राच्या अपार्टमेंटमध्ये 22 लाख रुपये किमतीचे वीज वापरतो. आमिर खान आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तांमध्ये प्रमुख भूमिकेत दिसून येतील. बॉलीवूडच्या इतिहासात हा पहिलाच चित्रपट आहे जेव्हा आमिर आणि अमिताभ एकत्र या   चित्रपटात दिसणार आहे. 4 नोव्हेंबरपासून आमिर पुन्हा एकदा सत्यमेव जयतेच्या टीव्ही शोचे आयोजन करणार आहे.
 
* तसेच सदीचे महानायक (अमिताभ बच्चन) जुहूच्या बंगल्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह राहतात, ज्यांचे बिल किमान 22 लाख रुपये येते. 8 नोव्हेंबरला त्यांचे चित्रपट चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तांमध्ये ते आजादची मोठी भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट यशराज बॅनरच्या अंतर्गत तयार करण्यात आला असून याचे दिग्दर्शक विनय कृष्ण आचार्य आहे.
 
* बॉलीवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान बद्दल देखील बोलू. सलमान आपल्या गॅलॅक्सी अपार्टमेंटचे विजेचे बिल 23 लाख भरतो. सध्या सलमान खान चित्रपट उद्योगात टॉपवर आहे. तो लवकरच, भारत, वॉन्टेड 2 आणि दबंग 3 मध्ये दिसणार आहे.
 
* बॉलीवूड नवाब सैफ अली खान त्याच्या केबिनसाठी 30 लाख रुपये देतो, हे कोणाच्याही बंगल्यापेक्षा बरेच जास्त आहे. नुकतेच सैफचा चित्रपट बाजार रिलीज झाला, जो बॉक्स ऑफिसमध्ये फ्लॉप असल्याचे सिद्ध झाले. 
 
शेवटी बोलू या बर्थडे ब्वॉय आणि बॉलीवूडच्या बादशहा शाहरुख खानबद्दल. 
किंग खान आपल्या बंगल्या 'मन्नत'चे महिन्याचे 43 लाख विजेचं बिल भरतो, जे बाकींपेक्षा फार जास्त आहे. सध्या तो त्यांचे चित्रपट 'जिरो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे जे क्रिसमसच्या दिवशी रिलीज होणार आहे.