1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (17:35 IST)

शाहरूख साकारणार राकेश शर्मा

shahrukh khan
सध्या एका पाठोपाठ एक रिलीज होत असलेल्या बायोपिक्समध्ये अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची भर पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शाहरूख खान यामध्ये राकेश शर्मा यांची भूकिा साकारणार आहे. निर्माता रॉनी स्क्रूवालने ही माहिती दिली. शाहरूख पुढील वर्षीच्या सुरुवातीलाच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. या चित्रपटाची पटकथा अंजू राजाबली यांनी लिहिली असून दिग्दर्शन महेश थाई करणार आहेत. सिद्धार्थ रॉय कपूर आणि रॉनी स्क्रूवाला संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे नाव 'सारे जहाँ से अच्छा' असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. तसेच चित्रपटात शाहरूखची नायिका म्हणून भूमी पेडणेकरला संधी देण्यात येईल, असे बोलले जात आहे. त्याबद्दल विचारले असता चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असे उत्तर रॉनीने दिले.