गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (14:19 IST)

'सॅल्यूट'मध्ये शाहरुखसोबत दिसणार भूमी पेडणेकर

शाहरूख खानच्या आगामी 'सॅल्यूट' या चित्रपटाला अखेर नायिका मिळाली असून अभिनेत्री भूमी पेडणेकर या चित्रपटात शाहरूखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. बर्‍याच कालावधीपासून शाहरूख खानचा आगामी चित्रपट 'सॅल्यूट'साठी नायिकेचा शोध सुरू होता. या चित्रपटासाठी गेल्या काही दिवसांपासून बर्‍याच अभिनेत्रींची नावे समोर आली. प्रियांका चोप्रापासून वाणी कपूर अशा लीडच्या अभिनेत्रींच्या नावावर त्यात चर्चा झाली. पण अभिनेत्री भूमी पेडणेकरची आता 'सॅल्यूट'साठी वर्णी लागल्याचे समजते आहे. भूमी पेडणेकर 'सॅल्यूट' चित्रपटातून पहिल्यांदा शाहरूख खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ती या चित्रपटात शाहरूखच्या पत्नीची भूमिका करताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी भूमी पेडणेकरला साईन करण्यासाठी चित्रपट निर्माते बर्‍याच कालावधीपासून मुलाखत करत होते. कारण त्यांना शाहरूख खानसोबत चांगला परफॉर्मन्स करणारी अभिनेत्री हवी होती. अखेर निर्मात्यांचा शोध थांबला असून भूमी पेडणेकरची या चित्रपटासाठी वर्णी लागली आहे.