सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'कुछ कुछ होता है' पार्ट टू रणबीर कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर करणच्या चित्रपटात

'कुछ कुछ होता है' हा सिनेमा आजही  प्रेक्षक आठवतात आणि कोठे वाहिनीवर लागला तर हमखास बघतात. हा करन जोहरचा सर्वात यशस्वी सिनेमा असून, आजही फेव्हरेट सिनेमांमध्ये हा सिनेमा आहे. या चित्रपटात शाहरूख खान, काजोलची केमिस्ट्री आणि राणी मुखर्जीचा हॉट अंदाज पाहिला आहे. मैत्री आणि प्रेम यांच्यावर आधारित हा सिनेमा असून खूप गाजला होता. मात्र आता कुछ कुछ होता है या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक खुशखबरी करण जोहरने दिली आहे. 
 
निर्माता करण जोहरने सांगितलं आहे की, जर कधीही त्याने कुछ कुछ होता है च्या सिक्वलचा विचार केला. तर तो अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूरला घेऊन हा सिनेमा बनवणार असून लवकरच त्या बाबत काम सुरु करणार आहे. विशेष म्हणजे या  सिनेमातून करण जोहरने आपल्या दिग्दर्शनाला सुरूवात केली. या सिनेमांत शाहरूख खान, काजोल आणि राणी मुखर्जी कास्ट केलं होतं. इश्क 104.8 वर या चॅलनवर 'कॉलिंग करण सिझन 2' कार्यक्रमा दरम्यान प्रेक्षकाने विचारलं तेव्हा करण ने उत्तर देत रिमेक नाही तर सिक्वल पार्ट टू तो तयार करणार असल्याचे सांगत रणबीर मुख्य भूमिकेत असेल असे त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता करण कधी काम सुरु करतोय याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.