बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (16:11 IST)

पहिल्याच चित्रपटात सैफच्या मुलीने दिला किसिंग सीन, रिलीज झाला केदारनाथचा ट्रेलर

बॉलिवूड पदार्पणातील अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं नाव ‘केदारनाथ’ असं असून यामध्ये सारा अली खानसोबत सुशांत सिंह राजपूतची मुख्य भूमिका आहे. बऱ्याच अडचणींवर मात केल्यानंतर अखेर साराच्या चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध झाला आहे.

‘केदारनाथ’ चित्रपटात सारा आणि सुशांतची प्रेमकहाणी दाखवण्यात आली असून,  २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये महापूर आला त्याचा संदर्भ या प्रेमकथेला आहे. प्रयोगशीलतेचीच साथ घेत आणि एका नव्या चेहऱ्याना नवी ओळख मिळवून देण्याचा मानस उराशी बाळगत दिग्दर्शक अभिषेक कपूर याने त्याच्या 'केदारनाथ' या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस घेवून आला आहे. हा चित्रपट ७ डिसेंबरला क्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी 'इस साल करेंगे सामना प्रकृती के क्रोध का और साथ होगा सिर्फ प्यार', असं त्याचा नारा आहे. सैफची मुलगी तरुण अमृता सिंग सारखी दिसत आहे. तर यात तिचा पहिला किसिंग सीन सुद्धा दिसून येतोय.