1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (16:58 IST)

सर्जिकल स्ट्राईकवर चित्रपट टीझर झाला रिलीज

vicky kaushal
भारताने पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकवर चित्रपट काढण्यात येणार आहे. या चित्रपटात ‘मसान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तर विकी कौशल या चित्रपटात सर्जिक स्ट्राईक करणाऱ्या तुकडीमधील जवान दाखवला असून त्याच्या बाजूने सर्व सैनिक कारवाई दाखवली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘उरी’ असं असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर करणार असून रॉनी स्क्रूवाला हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. विकीने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतल्याचं सांगितलं आहे. विकी म्हणतो की मी रोज 5 तास सराव करतोय आणि 3 किंवा 4 तास सैनिकी प्रशिक्षण घेतो आहे. त्याला मुंबईतील कफ परेडच्या नौदलाच्या तळावर त्याला प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात लष्कराचे अधिकारी मार्गदर्शन करत असल्याचंही विकीने सांगितलं आहे. त्यामुळे दमदार चित्रपट पहायला मिळणर आहे.