मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘ब्रह्मास्त्र’मध्ये नागार्जुन झळकणार

nagarjuna returns to bollywood
बऱ्याच वर्षांनी दाक्षिणात्य चित्रपटांमधील सुपरस्टार नागार्जुन बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या बिग बजेट चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अमिताभ बच्चनसुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. 
 
जवळपास २५ वर्षांपूर्वी नागार्जुनने ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘खुदा गवाह’, ‘क्रिमिनल’ आणि ‘जख्म’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने भूमिका साकारली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘LOC कारगील’ या चित्रपटानंतर तो आता ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे.