मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (13:22 IST)

आमिर एकमेव डेअरिंग अॅक्टर

हल्ली मोठे मोठे सुपरस्टार जरी ऑफ बीट फिल्मस करत असले तरी याबाबतीत आमिर खान हाच सर्वात धाडसी कलाकार आहे, असे निर्माता विशाल भारद्वाज यांचे मत आहे. 'मला सुपरस्टार्ससोबत काम करायचे आहे. मी त्यांच्याशी संबंध साधतो. त्यांनी जर होकार दिला तर ते माझ्या चित्रपटात दिसले असते, पण तसे काही अद्याप होऊ शकलेले नाही. कारण सुपरस्टार्ससोबत फिल्म करताना त्याचे स्क्रीप्टही तसेच तोलामोलाचे असावे लागते. मला वाटते आमिर खान हा सध्याच्या सुपरस्टार्समधला सर्वाधिक रिस्क घेणारा अभिनेता आहे. दंगलसाठी त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वावर जी काही मेहनत घेतली ती लाजवाब आहे', असे विशाल म्हणाला. अजय देवगण, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्यासारख्या टॉपच्या अभिनेत्यांसोबत विशालने काम केले आहे. त्याचा नुकताच रिलीज झालेला 'पटाखा' हा चित्रपट समीक्षकांच्या आणि रसिकांच्याही पसंतीस उतरलेला नाही. या चित्रपटात विशालने सान्या मल्होत्रा आणि राधिका मदन यांच्यासारख्या नव्या चेहर्‍यांना संधी दिली. पण चित्रपटाची भट्टी काही जमली नाही. 'पिकू' चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि इरफान खान या जोडीला घेऊन तो 'सपना दीदी' हा चित्रपट सध्या करत आहे.