मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (15:42 IST)

कंगना सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री

kangana ranawat
'पद्मावत' सिनेमा रिलीज झाल्यानंतर दीपिका पदुकोणला रणवीर सिंह आणि शाहिद कपूर पेक्षा जास्त फी दिली. त्यानंतर बॉलिवूडमध्य़े सर्वाधिक फी घेणारी ती अभिनेत्री बनली होती. पण आता दीपिकाला मागे टाकत बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री ठरली आहे. कंगनाने 'मणिकर्णिका: दि क्वीन ऑफ झांसी'साठी 14 कोटी रुपये घेतले आहेत. ही आतापर्यंतची बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींची सर्वात जास्त फी आहे. कंगना म्हणते की, तिची फी तिच्या रोलवर अवलंबून असते. प्रत्येक भूमिका आणि सिनेमाची वेगवेगळी मागणी असते. त्यानुसार फी ठरते.
 
'मणिकर्णिका: दि क्वीन ऑफ झांसी' सुरुवातीपासूनच वादात आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं असून हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.