मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 एप्रिल 2018 (14:04 IST)

म्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना!

अनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. पण एक अभिनेत्री या सेलिब्रेटींच्या लिस्टमध्ये अपवाद म्हणावी लागेल. ती आहे बिनधास्त कंगना राणावत. याबद्दल कंगनाला विचारले असता, सोशल मीडियावर खूप वेळ व्यर्थ खर्च होतो त्यामुळे मला सोशल मीडिया वापरायला नाही आवडत. मला माझे खूप सारे फॅन सोशल मीडिया वापरायचा सल्ला देतात पण मी मात्र त्यांना ठाम नकार देते, असे ती सांगते. मला माझे सहकारी म्हणतात की तुम्ही फक्त एक अकाऊंट सुरु करा बाकी सर्व आम्ही करतो. पण मला ते पटत नाही कारण मी कुठलेच असे काम करत नाही ज्यामध्ये मी स्वतः अ‍ॅक्टिव्ह नसते. मला वाटते असे केल्याने मी माझ्या प्रेक्षकांना धोका देत आहे. पण कंगना जरी सोशल मीडियावर सक्रिय नसली तरीही तिची बहीण रंगोली आणि मॅनेजर मात्र नेहमी त्यांच्या सोशल मीडियावरून कंगनाबद्दल प्रेक्षकांना अपडेट द्यायला कधीच विसरत नाहीत.