सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 जुलै 2018 (13:17 IST)

जे हवे त्यात अपयशच मिळाले - कंगना

कंगना आणि भांडण हे समीकरण काही नवीन नाही. ती सारखा कोणाबरोबर तरी 'पंगा' घेतच असते. त्यात तिला मजाही वाटत असावी. किंवा तिचा तो स्वभावही असावा. मात्र यामुळेच तिचे स्वतःचे नुकसानच होत असते, हे काही केल्या तिच्या लक्षात येतच नाही. व्यावसायिक दृष्टिकोनातून तिला या स्वभावाचा तोटा सहन करावा लागला आहे. पण वैयक्तिक खासगी आयुष्यातही तिला यास्वभावाचा फटका बसला आहे. कंगनाला एका इंटरव्ह्यूमध्ये लग्नाबाबत छेडले असता तिने ही बाब अप्रत्यक्षपणे कबूलही केली. कोणाबरोबर लग्न करायला आवडेल, असे विचारल्यावर पहिल्यांदा तर कंगना खूप खूश झाली. मात्र या प्रश्नाचे उत्तर एकदम न देता थोडा विचार करून तिने दिलेले उत्तर ऐकल्यावर तिने या विषयावर खूप विचार केला असल्याचे लक्षात येते. खरं तर आतापर्यंत लग्न झाले नाही, याचाच मला आनंद होतो आहे. कारण आतापर्यंत जे काही मिळाले आहे, त्यातच मी खूश आहे. जे काही हवे होते, त्याची अपेक्षा केली की हातात अपयशच मिळत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे जीवनसाथीदार कसा असायला हवा, याची अपेक्षा करण्यापेक्षा तो नाही, याच्यातच आनंद मानायला लागल्याचे कंगनाने सांगितले. तिचे हे उत्तर ऐकून दंग व्हायला होते की नाही ! तिला कोणाशी लग्र करायचे होते, हे अख्ख्या बॉलिवूडला माहिती झाले आहे. त्यामुळे त्या विषयाची पुनरावृत्ती करण्यात काहीच अर्थ नाही.