बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑक्टोबर 2018 (08:17 IST)

येत्या १४ आणि १५ नोव्हेबरला दीपिका- रणवीरसिंहचे लग्न

बॉलिवूडमधील लव्हबर्ड म्हणून ओळखली जाणारी दीपिका पदुकोण आणि रणवीरसिंह यांची जोडी अखेर 14 आणि 15 नोव्हेंबर 2018ला विवाहबंधनात अडकणार आहे. 
 
रणवीरने ही आनंदाची बातमी प्रसारमाध्यमांना दिली. ‘आम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की, दोन्ही घरच्या कुटुंबीयांच्या आशीर्वादाने मी अणि दीपिका 14 आणि 15 नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहोत. गेली अनेक वर्षे तुम्ही आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. प्रेम, एकनिष्ठा, मैत्री आणि सहचार्य यांचा संगम असलेल्या ‘लग्ना’चा प्रवास आता सुरू होणार आहे. त्यासाठी तुम्हा सगळय़ांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो, हीच अपेक्षा,’ अशा शब्दात रणवीरने आपल्या भावना व्यक्त केल्या.