शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (00:59 IST)

काही ज्योतिषीय योगामुळे विवाहविच्छेद होतात..

प्रेमविवाह ही माणसाच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाची घटना असेल तर विवाहविच्छेद ही संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत दु:खद घटना असते. त्याचप्रमाणे विवाहविच्छेदाला कारणीभूत असेही काही ज्योतिषयोग असतात. त्याची माहिती घेऊया.
 
विवाहविच्छेदाला अनुकूल असणारे काही ज्योतिषीय योग-
सातव्या स्थानात राहू किंवा केतूच्या उपस्थितीमुळेही दाम्पत्यजीवनात दुरावा निर्माण होतो.
सातव्या स्थानाचा स्वामी जर शुक्र नक्षत्रामध्ये असेल तर वैवाहिक जीवनावर परिणाम होतो.
सातव्या स्थानात जर गुरू विराजमान असेल तर वैचारिक मतभेद होतात.
सातव्या स्थानात मंगळ असेल तर नवरा-बायकोमध्ये भांडणाचे प्रसंग येतात.
सातव्या स्थानाचा स्वामी जर पाचव्या किंवा नवव्या स्थानात विराजमान असेल तर दाम्पत्य जीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. घटस्फोटाची स्थिती उद्भवते.
जर मंगळ व शुक्र एकत्र असतील आणि इतर ग्रहांची स्थिती कमजोर असेल तर विवाह असफल होण्याचे प्रमाण जास्त असते. शुक्राच्या महादशेदरम्यान जोडप्यांमध्ये दुरावा वाढत जातो.
सप्तमेश (सातव्या स्थानाचा स्वामी) जर आठव्या किंवा बाराव्या स्थानी विराजमान असेल तर संबंधात दुरावा येऊन घटस्फोटाची स्थिती येते.
सप्तमेश सहाव्या किंवा आठव्या स्थानात विराजमान असेल तर जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध येऊ शकतात व वैवाहिक जीवनावर परिणाम होतो.
सातव्या स्थानात शनीची उपस्थिती वैवाहिक जीवनात ताण निर्माण करते.
शुक्र जर सातव्या स्थानाचा स्वामी असून सातव्या स्थानातच विराजमान होत असेल तर ते अशुभ असते.
सातव्या स्थानात शुक्र विराजमान असेल तर व्यक्ती कामुक असून विवाहबाह्य संबंध ठेवते. अर्थातच त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन नष्ट होते.
बुध जर सातव्या स्थानाचा स्वामी होऊन पाचव्या स्थानात विराजमान होत असेल तर जोडीदाराबरोबर गंभीर मतभेद होऊ शकतात.
मंगळाची चौथी, सातवी व आठवी दृष्टी दाम्पत्य जीवन नष्ट करते.
शनीची तिसरी, सातवी व दहावी दृष्टी वैवाहिक जीवनासाठी कष्टदायक ठरते.
मंगळाची सातवी दृष्टी कौटुंबिक संबंध नष्ट करते.