बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 जानेवारी 2019 (18:00 IST)

बॉलिवूडमधील सर्वात हँडसम!

'कहो ना प्यार है' या चित्रपटातून सर्वांच्या हृदयावर राज्य करणारा बॉलिवूडचा हृतिक रोशन हा जगातीलसर्वात हॅन्डसम अभिनेता ठरला आहे. बॉलिवूडमध्ये हृतिक हा सर्वात हॅन्डसम आणि सुंदर दिसणारा अभिनेता आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात आकर्षक व्यक्तींपैकी एक म्हणजे हृतिक. त्याने प्रेक्षकांची फक्त लूकमुळे नव्हे तर डान्समुळेही मनं जिंकली आहेत. हृतिकने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली. आणि बॉलिवूडमध्ये 'कहो ना प्यार है' या पहिल्या चित्रपटापासून हृतिक लाखो प्रेक्षकांच्या हृदयात बसला. यानंतर त्यांने 'मिशन काश्मीर', 'कभी खुशी कभी गम', मै प्रेम की दीवानी हूं, 'कोई मिल गया', 'क्रिश', ' धूम 2' सारख्या बर्‍याच चित्रपटातून भूमिका केल्या. भारतातच नव्हे तर हृतिकचा स्टारडम परदेशात देखील आहे. त्याने एक यादी जाहीर केली आहे. या यादीत हृतिक सर्वात सुंदर दहा अभिनेत्यांच्या यादीत प्रथमस्थानी आहे. हृतिकने या बाबतीत रॉबर्ट पॅटिन्सन, टॉम हिडलस्टन, हेनरी केवील, नोहा मिल्स, क्रिस एवन्स, डेव्हिड बोरियानस अशा अनेक तार्‍यांना मागे टाकले आहे. यापूर्वी 2011-2012 मध्ये जगातील सर्वात 50 सेक्सी आशियाई पुरुषांच्या यादीतही हृतिक हा टॉपला होता. लवकरच हृतिकचा बिहारच्या प्रसिद्ध गणिततज्ज्ञ आनंद कुमारच्या कथेवर आधारित 'सुपर 30' हा चित्रपट येतोय.