रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 31 डिसेंबर 2018 (12:31 IST)

शाहरुखला साकारायची आहे विराटची भूमिका

बॉलिवूडमध्ये सध्या असलेल्या बायोपिकच्या ट्रेंडमधील संजू, अजहर, एम. एस धोनी, मेरी कोम आणि भाग मिल्खा सारख्या सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशात आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनेदेखील बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जीवनावर आधारित चित्रपटात त्याला काम करायचे आहे, असे शाहरुखने म्हटले आहे. एका मुलाखतीत तो बोलत होता. यावेळी त्याच्यासोबत विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या समोरच आपली ही इच्छा व्यक्त केली. शाहरुखची ही इच्छा ऐकल्यानंतर अनुष्काने त्याला विराटची भूमिका साकारायची असेल तर तुला त्याच्यासारखी दाढी वाढवावी लागेल, असे गमतीत म्हटले, असे झाल्यास झीरो ठरलेल्या शाहरुखला पुन्हा एकदा हीरो बनण्याची संधी मिळेल. 'झीरो'मध्ये शाहरुख एका बुटक्याच्या म्हणजेच 'बऊआ सिंग'च्या भूमिकेत दिसत आहे. पण तरीही किंग खानची जादू काही झीरोला तारू शकलेली नाही. शाहरुखसोबतच या चित्रपटात झळकणार्‍या कतरिना कैफ  आणि अनुष्का शर्माही आहेत.