बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

आई झाल्यावर खेळाडूंची रँकिंग तीन वर्षांपर्यंत सुरक्षित

आता महिला टेनिस खेळाडूंची रँकिंग आई झाल्यावरही खाली पडणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस संघ (डब्ल्यूटीए) ने हा निर्णय दिला आहे. अशा खेळाडूंची रँकिंग ब्रेक घेतल्यावर तीन वर्षांपर्यंत सुरक्षित राहील. हा लाभ जखमी खेळाडूंना देखील मिळेल. तरी, डब्ल्यूटीएने अशा खेळाडूंना टूर्नामेंट सीडिंग देण्याची हमी देण्यास नकार दिला आहे.
 
सीडिंग देण्यावर डब्ल्यूटीएचे म्हणणे आहे की याचा हक्क टूर्नामेंट आयोजकांकडे आरक्षित असेल. तरी अशा खेळाडूंना पहिल्या फेरीत सीडेड खेळाडूंशी सामाना करावा लागणार नाही याची खात्री मात्र दिली आहे.
 
अमेरिकी टेनिस स्टार सेरेना विलियम्सने 2017 मध्ये आई झाल्यावर या फेब्रुवारीत वापसी केली होती. परंतू त्यांना फ्रेंच ओपनमध्ये सीडिंग देण्यात आली नाही. तरी विम्बल्डनमध्ये तिला 25वी देण्यात आली होती. तेव्हा रँकिंगदृष्ट्या ती टॉप 32 हून बाहेर होती.
 
डब्ल्यूटीएने खेळाडूंना ड्रेस कोड बाबतीत देखील सवलत दिली आहे. अमेरिकन स्टार सेरेना विलियम्स आता आपला ब्लॅक कॅट सूट परिधान करू शकेल. डब्ल्यूटीएने सांगितले की लेंगिंग आणि मिड थाय कम्प्रेशन शॉर्ट्स स्कर्टशिवाय देखील घालता येऊ शकतं.