1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (17:51 IST)

ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी सेरेनाने म्हटल गाण

serena williams
प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विल्यम्सने ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांच्या कर्करोगासंबंधीच्या जनजागृती महिन्याच्या निमित्ताने सेरेनाने एक गाणं गायलं आहे. या माध्यमातून तिने अत्यंत महत्त्वाचा असा संदेश दिला आहे. अतिशय महत्त्वाचा संदेश पोहोचवण्यासाठी तिने टॉपलेस होऊन गाणं गात सर्वांचच लक्ष वेधलं आहे. 'आय टच मायसेल्फ' असे बोल असणाऱ्या या गाण्याची अनेकांनीच प्रशंसा केली असून सेरेनाचंही कौतुक केलं आहे. 
 
स्वत:च्या चौकटीतून बाहेर येत सेरेनानं सर्वच महिलांना वेळोवेळी त्यांनी वैद्यकिय तपासणी करुन घ्यायवी अशी विनंतीही केली आहे. कॅन्सरचा आजार बळावण्यापूर्वीच त्याचं निदान झाल्यास वेळीच योग्य ते उपचार घेतल्याल अनेक जीव वाचतील असं तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.