शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

मी कोण आहे?

ब्रह्माने अनेक प्राण्यांची रचना केली आणि त्यातून ज्या दोन प्राण्यांमुळे सृष्टी निर्माण झाली ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. पौराणिक कालावधीत प्रत्येक वेद आणि ऋचा मध्ये स्त्रीचे गुणगान करण्यात आले आहे. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, भारती, शकुंतला ते सीता, कुंती, द्रौपदी, अहिल्या, तारा, मंदोदरी इतरांचे आख्ख्यानं आमच्या समोर आहे की त्या काळातील स्त्री अन्याय विरुद्ध प्रखर आवाज उचलत होती. ती केवळ पुरुषांची सावली बनून नव्हे तर आपल्या व्यक्तिमत्त्वासह चमकत होती.
 
द्रौपदीचे भरलेल्या सभेत मोठ्यांना विचारलेले प्रश्न असो वा दुशासनाच्या रक्ताने केस धुण्याचा कठोर संकल्प... सीतेचे धरतीचे सामावून जाणे असो किंवा परित्याग करताना श्रीराम यांच्याप्रती लक्ष्मणाला बोलले शब्द की श्रीराम यांनी अविचाराने कार्य केले आहे... त्या युगात आपल्या पतीला निकृष्टतम म्हणणे दर्शवत की नारी पतीचे अनुसरण करणारी नसून सचेत होती, प्रश्न करायची. त्या काळापासून ते आजपर्यंत स्त्रीसोबत वेगवेगळ्या प्रकाराचे 'विशिष्ट' अनुभव जुळत गेले आहेत. एकीकडे तिच्या गौरवाचे दिव्य वर्णन मिळेल तर दुसरीकडे तिच्यावर होणार्‍या शोषणाचे वर्णन करणारे ग्रंथही सापडतील. आज देखील स्त्रियांवर कविता, कहाण्या, उपन्यास लिहिले जात असले तरी आकडे सांगतात की प्रत्येक 15 मिनिटात या देशात एका स्त्रीवर बलात्कार होतो.
 
प्रत्येक क्षेत्रात यशाची पायरी चढत असलेली स्त्री हा आकडा बघून हैराण आहे की प्रत्येक चार तासात देशभरात गँगरेप होतो. शोषण, छेडछाड, अपहरण, हत्या, यातना, घरगुती हिंसा, हुंडा, तेजाब सारखे भयावह शब्द आहे ज्याबद्दल खरोखर आकडे कधीच समोर येत नसून पडद्यामागे घुटमळत दम सोडतात.
 
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः
यत्रै नास्तुन पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः||
 
प्राचीन मनुस्मृति मध्ये स्त्रियांचे महत्त्व सांगितले गेले आहे की जिथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे देवतांचा वास असतो आणि जिथे स्त्रीचा अपमान होतो तिथे सर्व धर्म-कर्म निष्फल होतात. आश्चर्य म्हणजे असे उच्च विचार असलेल्या या देशात स्त्रीसोबत भयानक अत्याचार घडत असतात. 
 
मनुस्मृति मध्ये सांगितले गेले आहे की
किद्विधा कृत्वाऽऽत्मनस्तेन देहमर्धेन पुरुषोऽभवत्।
अर्धेन नारी तस्यां स विराजमसृजत्प्रभुः||
 
अर्थात त्या हिरण्यगर्भाने आपल्या शरीराचे दोन भाग केले, अर्ध्याने पुरुष तर दुसर्‍या अर्ध्या भागाने स्त्री निर्मित झाली. घर, ऑफिस आणि देश सांभणार्‍या स्त्रीला ज्या देशात बरोबरीचा दर्जा देण्यात आला त्या देशात स्त्रीसोबत होत असलेली दुर्दशा बघून काय आपल्या मनात वेदना होत नाही... 
 
साम्राज्ञी श्व्शुरे भव साम्राज्ञी स्वाश्र्वां भव ।
ननान्दरी साम्राज्ञी भव साम्राज्ञी अधि देवृषु ॥
 
ऋग्वेदामध्ये स्त्रीला कुटुंबाची स्वामिनी, साम्राज्ञी पदवी देत म्हटले आहे की मानव जीवनाच्या प्रगतीसाठी स्त्रीचा सहयोग आवश्यक आहे.
 
आज आवश्यकता आहे की धर्माच्या नावाखाली आंडबर करणार्‍या आमच्यासारख्या लोकांनी स्त्रीला तेच स्थान, प्रतिष्ठा देण्यासाठी पुढे येण्याची. वर्तमान परिस्थितीत तर धर्म प्रमुखांवर स्त्री शोषणाचे आरोप सिद्ध होत आहे. आसाराम असो किंवा राम रहीम, नित्यानंद असो किंवा रामपाल.. नावं वाढतच चालले आहेत.
 
पण काय आम्ही स्त्रीला पुन्हा तो मान देण्यात सक्षम नाही? किंवा आम्ही वाट बघत आहोत त्या दिवसाची जेव्हा सर्जनकरता स्त्रीच्या गर्भातून पुरुषाला जन्म घालण्यापासून वंचित ठेवे.
 
पाळण्यातील चिमुकलीदेखील विकृत मानसिकतेला बळी जात आहे आणि वयातील 80 व्या वर्षाची वृद्धादेखील या देशात आपली अब्रू घालवून देशाच्या सतत ढवळत असलेल्या चरित्रावर लाचार दिसून येत आहे. विवाहित असो वा नोकरी करणार्‍या, मॉर्डन असो वा पल्लु काढणारी, शहरातील असो वा गावातील, किशोरी असो वा तरुण, गर्भवती असो वा कुमारिका, प्रत्येक वयोगटातील स्त्रीसोबत पुरुषांनी केलेले अत्याचारांचे आकडे जुळलेले आहे आणि लज्जास्पद म्हणजे सतत वाढत आहे.
 
वेबदुनियाने वेळोवेळी सामाजिक विषय व लैंगिक संवेदनाशीलतेवर आपल्या स्तरावर सतत आवाज उचलेली आहेत. आज पुन्हा वेबदुनियाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक स्त्रीचे आपल्यासाठी काही प्रश्न. हृद्याला हादरवणार्‍या या व्हिडिओला एकदा नक्की बघा...