गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 5 जुलै 2018 (15:56 IST)

इंडोनेशियन ओपन: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

Indonesia open
पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. सिंधूने जपानच्या आया ओहोरीचे आव्हान 36 मिनिटांतच 21-17,21-14 असे संपुष्ठात आणले. तिने ही कामगिरी करत आपला 23 वा वाढदिवस साजरा केला. 
 
आता इंडोनेशियन ओपनच्या उपांत्य लढतीत जागतिक तृतीय मानांकित सिंधूची गाठ थायलंडची बुसानान किंवा चीनची हे बिन्गजियाओ यांच्यातील विजयी खेळाडूशी पडेल. सिंधूचा हा ओहोरीवरील 5 वा विजय आहे.