शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 10 एप्रिल 2018 (13:19 IST)

भारताच्या बॅडमिटिंन संघास मिश्र गटाचे सुवर्णपदक

भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी तीनवेळा विजेतेपद मिळविणार्‍या मलेशिया संघाचा अंतिम सामन्यात पराभव केला. 
 
सात्विक रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने मलेशियाच्या पेंग सून चान आणि ल्यू योंग गोह या जोडीचा 21-14, 15-21, 21-15 असा पराभव केला. तत्पूर्वी किंदाबी श्रीकांतने तीनवेळा ऑलिम्पिक रौप्पदक मिळविणार्‍या ली याचा 21-17,21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. 
 
रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी मात्र गोह आणि वी कोंग टॅन यांच्याकडून 15-21, 20-22 अशी पराभूत झाली. परंतु, फॉर्ममध्ये असलेल्या सायना नेहवालने मलेशियाच्या विजेतेपदाच्या आशेवर पाणी फेरले तिने महिला एकेरीत सोनिया चीह हिच्यावर 21-11, 19-21, 21-9 अशी मात केली. भारताच्या संघाने मलेशियाला नमवून सुवर्णपदकाला गवसणी घातली.