1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated :गोल्ड कोस्ट , मंगळवार, 10 एप्रिल 2018 (15:39 IST)

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला 11 सुवर्णपदके, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके

commonwealth games 2018

भारताची नेमबाज हीना सिद्धूने 25 मीटर रॅपिड पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात 11 सुवर्णपदकं जमा झाली आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत हीनाचं हे दुसरं पदक ठरलं आहे. हीनाने 38 गुण कमावून सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी हीना सिद्धूने महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकारातही  रौप्यपदक पटकावलं होतं. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 20 पदकांची कमाई केली आहे.  भारताने 11 सुवर्णरौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे.