रविवार, 14 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 7 एप्रिल 2018 (11:05 IST)

राष्ट्रकुल स्पर्धा, वेटलिफ्लिंगमध्ये आणखी एक सुवर्ण

satsh shivlinga
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदकाची कमाई झाली आहे. तीन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई भारताने केलेय. वेटलिफ्लिंगमध्ये सतीश शिवलिंगमने सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुषांच्या ७७ किलो वजनी गटात ३१७ किलो वजन उचलून शिवलिंगमने भीम पराक्रम केलाय. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
सध्या भारताच्या खात्यात २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदक जमा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही चारही पदक भारताला वेटलिफ्टींग प्रकारात मिळालेली आहेत. गुरुराजा, मीराबाई चानू, संजिता चानू आणि दिपक लाथेर यांनी पदकांची कमाई केली आहे.