बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 4 एप्रिल 2018 (14:24 IST)

जागतिक मानांकनात अंकिताची भरारी

भारताची टेनिसपटू अंकिता रैना हिने महिलांच्या जागतिक टेनिस मानांकनात 43 स्थानांनी भरारी घेतले आहे. ती आता 212 व्या स्थानावर पोहोचली आहे. रामकुमार रामनाथने चार स्थानांनी आगेकूच करीत 132 वे स्थान प्राप्त केले आहे. ग्वाल्हेर येथे झालेल्या महिलांच्या जोरावर अंकिताने हे यश मिळविले आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्याच्या स्वप्नाच्याजवळ मी आले आहे. तुम्ही जर कठोर परिश्रम घेतले तर तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता, असे अंकिताने सांगितले. एटीपी क्रमवारीत युकी भांबरीने दोन स्थानांनी सुधारणा करीत 105 वे स्थान प्राप्त केले.